देवगड तालुक्यातील मिठबाव गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने व पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा  आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

204

देवगड तालुक्यातील मिठबाव गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने व पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा  आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

देवगड (प्रतिनिधी)

मिठबाव मधील कबीर नगर येथील विहीर बांधणे, बौद्धवाडी येथे ओपन जिम बसविणे, पोस्ट ऑफिस ते स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण, मिठबाव ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक जागेत भाजी मार्केट बांधणे, मिठबाव मुख्य रस्ता ते घाडीवाडी रस्ता डांबरीकरण करणे, मिठबाव बाजारपेठ ते भोजनेवाडी पर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे, मिठबाव तांबळडेग मुख्य रस्ता ते अनंतवाडी ब्राह्मण देव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मिठबाव येथील स्मशानभूमी शेड दुरुस्त करणे, मिठबाव स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, पेडणेकर वाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे, यातील नियोजित विकासकामांचा भूमिपूजन सोहळा  व पूर्ण झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला .

 

यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, सरपंच भाई नरे, श्री.बाळा खडपे,श्री.प्रकाश राणे,माजी जि.प.सदस्य सौ. सावी लोके, माजी सभापती श्री.भाई पारकर, तालुकाध्यक्ष श्री.संतोष किंजवडेकर यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.