Home देवगड पोयरे अपघातातील एसटी चालक काळे यांचे निधन ; अपघात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा...

पोयरे अपघातातील एसटी चालक काळे यांचे निधन ; अपघात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल

31

पोयरे अपघातातील एसटी चालक काळे यांचे निधन ; अपघात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी)

पोयरे एसटी अपघातातील जखमी एसटी चालकाचे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले .या अपघात प्रकरणी देवगड पोलीस स्थानकात चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता खुडी मार्गे जाणारी देवगड गाडीला अपघात झाला होता. एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून पोयरे येथील भगवान सावंत यांच्या घरावर धडकली होती. अपघातात चालक बापू लक्ष्मण काळे ५५( राहणार तरळे) हा गंभीर जखमी झाला होता. तर वाहक राजेंद्र मनोहर जाधव यांच्या सहित दोन प्रवाशीही जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले होते. चालक बापू काळे यांचे शनिवारी सायंकाळी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचारादम्यान मृत्यू झाला.देवगड पोलीस स्थानात या अपघात प्रकरणी वाहक राजेंद्र मनोहर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालक बापू लक्ष्मण काळे यांनी आपल्या ताब्यातील एसटी बस घेऊन जात असताना रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविले व त्याचे एसटी वरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन घराला धडक देऊन थांबली. या अपघातात प्रवासी यांच्या दुखापतीला तसेच स्वतःच्या गंभीर दुखापतीला मृत्यूला एसटीच्या नुकसानीला तसेच संजय सावंत पोयरे यांच्या घराच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रमाणे चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम करत आहेत.