आरोग्य निरोगी व प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने या ग्रामपंचायतचा कौतुकास्पद उपक्रम पहा कोणता ते
देवगड प्रतिनिधी
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत ग्रामपंचायत किंजवडे यांच्या वतीने नोंदणीकृत लॅब कडून किंजवडे गावाची वायू गुणवत्ता परीक्षण सरपंच श्री. संतोष किंजवडेकर यांच्या संकल्पनेतून असा उपक्रम राबवणारी किंजवडे ही जिल्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वायू तत्वाचा विचार करून देवगड तालुक्यातील किंजवडे गावात NABL या नोंदणीकृत लॅब कडून वायू गुणवत्ता परीक्षण करण्यात आले.किंजवडे ग्रामपंचायत, किंजवडे हायस्कुल, घाडी पाडावे वाडी, नवदुर्गा मंदिर, हनुमान मंदिर या सार्वजनिक आणि रहदारीच्या ठिकाणी NABL नोंदणीकृत लॅब कडून वायू गुणवत्त्ता परीक्षण करण्यात आले.
हवेची गुणवत्ता Air Quality Index सह मोजली जाते. AQI थर्मामीटर सारखे काम करते. AQI च्या माध्यमातून हवा किती स्वच्छ किंवा प्रदूषित आहे याचे मोजमाप केले जाते.
गुणवत्ता मोजण्याच्या मशीननच्या मदतीने, नायट्रोजन डायऑक्साइड (NO2), नायट्रस ऑक्साईड (NO), कार्बन डायऑक्साइड (CO2), कार्बन मोनोऑक्साइड (CO), सूक्ष्म कण (PM2.5), आणि ओझोन (O3) चे प्रमाण मोजले जाऊ शकते.
AQI हे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. किंजवडे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी राखण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरण प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने किंजवडे ग्रामपंचायतच्या वतीने राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.



