स्वतःमधील नकारात्मकता दूर करा – डॉ.लवू आचरेकर

22

स्वतःमधील नकारात्मकता दूर करा – डॉ.लवू आचरेकर

देवगड (प्रतिनिधी)

स्वतःमधील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेचा स्वीकार करून ती जोपासावी असे प्रतिपादन डॉ. लवू आचरेकर यांनी शेठ म.ग. हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले..

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानीय समितीचे सचिव अँड अविनाश माणगावकर , प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लवू आचरेकर ,स्थानीय समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे , प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे , पर्यवेक्षक सुनील घस्ती ,पालक – शिक्षक संघाच्या सहकार्यवाह सौ. नम्रता भिडे , शाळेची विद्यार्थी मुख्यमंत्री हर्षदा कदम ,सांस्कृतिक मंत्री हर्ष बोंडाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे तसेच शाळेतील इंग्रजी क्लब मार्फत आयोजित इंग्रजी शैक्षणिक साहित्य , प्रतिकृती , इंग्रजी पुस्तके प्रदर्शन व गणित विषयाचे पोस्टर प्रदर्शन या सर्वांचे उद्‌घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष  अँड अविनाश माणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी विविध विषय समित्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा व शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवात
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी मधून उत्कृष्ट खेळाडू म्हणून आराध्य चौगुले व समृद्धी शिंदे याचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरव करण्यात आला. उच्च माध्यमिक स्तरावर घेण्यात आलेल्या क्रीडामहोत्सवात यश संपादन केलेच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देवून गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अँड अविनाश माणगावकर यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुण आणि कौशल्य हेरुन यांचा अधिकाधिक विकास होण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील रहावे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी केले. अहवाल वाचन पर्यवेक्षक सुनील घस्ती यांनी केले तर पाहुण्याचा परिचय प्रविण खडपकर , बक्षिस वाचन निशा दहिबावकर व करुणा नारिंग्रेकर यांनी केले तर सुत्रसंचालन सागर कर्णिक यांनी तर आभार शामू जंगले यांनी मानले . त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले.