सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

19

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार आज शुक्रवारी जाहीर करण्यात आले . यामध्ये ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण पत्रकार पुरस्कार मालवण मसुरे येथील दत्तप्रसाद पेडणेकर, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडी येथील श्रीधर साळुंखे यांना तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार नंदकुमार अहिरे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण ६ जानेवारीला मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे कार्यकारणीची आज सिंधुदुर्ग नगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येथे पत्रकार पुरस्कार निवडीसाठी बैठक संपन्न झाली. यावेळी पुरस्कार निवड निश्चित झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय पत्रकार कक्षात अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, सहसचिव महेश रावराणे, सदस्य महेश सरनाईक, राजन नाईक, संतोष राउळ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष तोरसकर यांनी अन्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दोडामार्ग गणपत डांगे, सावंतवाडी अवधूत पोईपकर, कुडाळ प्रमोद म्हाडगूत, वेंगुर्ला प्रथमेश गुरव, देवगड दयानंद मांगले, यांचा समावेश आहे .
६ जानेवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे नव्याने उभारण्यात आलेले बाळशास्त्री जांभेकर स्मारक तथा पत्रकार भवन येथे यावर्षीचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यावेळी प्रमुख व्यक्ते म्हणून संपादक वसंत भोसले, रेल्वे पोलीस आयुक्त तथा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ रवींद्र शिसवे हे उपस्थित राहणार आहेत . तसेच या कार्यक्रमासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर , तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांना निमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. असे यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी सांगितले.