यंदाची आंगणेवाडी श्री देवी भराडी यात्रा शनिवार 2 मार्चला
मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारी आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे मालवण तालुक्यातील आंगणेवाडी . याचं आंगणेवाडीतील श्री देवी भराडी जत्रोत्सवची तारीख निश्चितीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी यात्रेंच्या तारखेकडे डोळे लावून असतात. डिसेंबर महिना आला की मुंबईस्थित चाकरमानी, मित्रमंडळी आपआपल्या नातेवाईकांना सतत संपर्क ठेवून असतात. तारीख निश्चित झाली की यात्रेला येण्यासाठी तिकीट बुकिंगसाठी गर्दी सुट्टी करिता धडपड सुरू असते. काही दिवसापूर्वी पारध करण्यासाठी त्यानंतर धार्मिक विधी केल्यानंतर आज सकाळी मंडळाच्या वतीने आंगणेवाडी यात्रा शनिवारी दोन मार्चला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.





