खारेपाटण : आज कात उत्पादक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खारेपाटण येथे संपन्न झाली.
सर्व पदाधिकारी सभासद आणि माजी आमदार राजन तेली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनमंत्र्यांकडील प्रलंबित अर्ज, कात उत्पादन परमिट, कात वाहतूक पास इ. विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली.
यावेळी राजन तेली यांनी याविषयी आपण कात उत्पादकांसोबत असून तातडीने वनमंत्र्यांकडे बैठक लावू आणि हा संपूर्ण विषय सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे स्पष्ट आश्वासन दिले. आजच नागपूर अधिवेशन संपले आहे.आता सर्व अधिकारी व मंत्री मुंबईत सहज उपलब्ध होतील. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात बैठक घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संघटनेच्या वतीने श्री. तेली यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर चांदोरकर यांनी केले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कदम यांनी वाहतूक पास व परमीट विषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हा बॅकेचे संचालक पदी निवड झाल्याबद्दल विद्याधर परब यांचा, भाजपा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष निवड झाल्याबद्दल श्री. चांदोरकर यांचा तर मुंबई हायकोर्टात संघटनेच्या वतीने केस लढत असल्याबद्दल राजाराम गावडे यांचे सत्कार करण्यात आले. हॉटेल व जेवणाची व्यवस्था संदेश धुमाळ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली.





