हमीभावाने भात खरेदी करताना येणाऱ्या अडचणींची प्रशासनाकडून तात्काळ दखल.! – चेअरमन प्रमोद गावडे. ; सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देत वेधले होते लक्ष.

40

सावंतवाडी : हमीभावाने भात खरेदी करताना ई नोंदणी अडथळा निर्माण झाला त्यांना भात शासकीय हमीभावाने विक्री करण्याची संधी शासकीय स्तरावरून देण्यासाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने दिलेल्या निवेदनाची दखल निवासी उपजिल्हाधिकारी यांनी घेतली असून कोकण आयुक्तांना याबाबत माहिती दिली आहे.

आधारभूत किंमत धान खरेदी योजना सन २०२३-२४ शेतकरी नोंदणी व खरेदी यामधील अडचणीबाबत खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. याशिवाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रमोद सावंत, तज्ज्ञ संचालक अभिमन्यू लोंढे, माजी उपसभापती विनायक दळवी,गजानन नाटेकर, आदी उपस्थित होते.