देवगड : देवगड – जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भाजपाचे विश्वामित्र खडपकर यांची निवड करण्यात आली. विश्वामित्र खडपकर यांची निवड भाजपाच्या वतीने बिनविरोध करण्यात आली असून स्वीकृत नगरसेवक चिंदरकर यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी आमदार अँड. अजित गोगटे, नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, विशेष कार्यकारी अधिकारी बाळा गावकर, बापू जूवाटकर, दयानंद पाटील, शामराव पाटील, वैभव करंगुटकर, भाजपा महिला अध्यक्ष उषःकला केळुस्कर तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी नंदकुमार कातकर यांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवगड – जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे उपस्थित होते.





