कोकण चित्रपट महोत्सवात ‘पाळी’ लघुपटाचा डंका.! ; ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ आणि ‘सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक’ दोन पुरस्कार मिळवून मारली बाजी.

73

देवगड : सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सव – 2023 या महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ आणि ‘सर्वोत्कृष्ट लघुपट दिग्दर्शक’ असे दोन पुरस्कार ‘पाळी’ या लघुपटला मिळाले आणि हे सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते मिळाले तसेच त्याचं प्रक्षेपण ‘सन मराठी चॅनेल’ होणार आहे.

‘पाळी’ या लघुपटात कलाकार म्हणून कृपा सादये, स्वानंदी कोदे, युक्त तोरस्कर, नम्रता तेजम, याज्ञवी कोदे, वृषाली तांबे, जानकी घाडीगावकर, वनिता घाडीगावकर, प्रणाली चव्हाण, भालचंद्र सावंत, तेज पाचंगे, अंकिता तेजम, साक्षी सादये, सचिन सादये यांनी भूमिका सकारल्या आहे. तसेच  निर्माता- लेखक- दिग्दर्शक – अनिकेत अर्चना जयवंत मिठबावकर, सहाय्यक दिग्दर्शक अमित पांचाळ, नम्रता परुळेकर, प्रोडक्शन हेड  श्रीधर पाचंगे, छायांकन सुजीत सामंत, रवीकिरण शिरवलकर यांचे असून संकलन चिन्मय विष्णू सावंत यांचे लाभले आहे.

लघुपट – पाळी .

दिग्दर्शक – अनिकेत ज.मिठबावकर.

माई फिल्म प्रॉडक्शन