श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात सोलर सिस्टीम बसविणेच्या कामाला सुरूवात.! ; जिल्हा वार्षिक योजनांतर्गत अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतमधून निधीची तरतूद.

97

देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर भक्त निवास व श्री देव कुणकेश्वर मंदिरकरिता जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतमधून ऑन ग्रीड सोलर सिस्टीम बसविणे या कामाला सुरूवात माजी सरपंच चंद्रकांत घाडी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत कुणकेश्वर सरपंच शशिकांत लब्दे, श्री देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, ग्रामसेवक गुणवंत पाटील, ग्रा. प. सदस्य महेश ताम्हणकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान विश्वस्त मंगेश पेडणेकर, संजय आचरेकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान विश्वस्त अनिल खापणे, रामदास तेजम, संतोष लाड, मंगेश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.