बांदा येथे १८ रोजी मोफत डोळे तपासणी शिबीर.! ; बांदा ग्रामपंचायत, रुक्मिणी सुपर बाझार, बांदा यांचे संयुक्त आयोजन.

50

बांदा : बांदा ग्रामपंचायत आणि रुक्मिणी सुपर बाझार, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय बांदा येथे सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.00 वाजे पर्यंत मोफत संपूर्ण डोळे तपासणी शिबीर आणि गरज भासल्यास रुपये तीन हजारपर्यंतचा चष्मा फक्त रू.160/- रुपयांत लगेच देण्यात येईल, तरी बांदा आणि दशक्रोशीतील नागरिकांनी सोबत आधारकार्ड घेऊन येणे आणि याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुक्मिणी बाझार बांदा व बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.