देवगड : शिरगाव येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रेत शिरगांव गांव OdF+ झाल्याबद्दल सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या हस्ते शिरगांव सरपंच समीर शिरगांवकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोषकुमार फाटक, समाजसेवक संदीप साटम, कृषी अधिकारी दिगंबर खराडे, ग्रा.पं. विस्तार अधिकारी अंकुश जंगले, सर्कल मंडळ अधिकारी आर. ए. निग्रे, तलाठी श्रीम. एस. के. खरात , ग्रा.पं. सदस्य राजेंद्र शेटये, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम. प्रतिमा वळंजु, विस्तार अधिकारी श्रीम. अडुळकर, मुख्यसेविका श्री. पूजा सावंत, ग्रामविकास अधिकारी रामदास हडपिडकर, गटसमन्वयक श्रीम .वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ हर्षदा बोथीकर, ग्रामविकास अधिकारी डी. एस. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, आशा, बचतगट प्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
ही विकसित भारत संकल्प यात्रा देवगड तालुक्यातील एकूण ७२ गांवाना भेटी देणार असुन दर दिवशी दोन गावांना सकाळी व दुपारी या कालावधीत या अभियानांतर्गत कार्यक्रम होणार आहेत.
केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, पीएम आवास योजना, पीएम भारतीय जन औषधी योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, जल जिवन मिशन , मनरेगा ,आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन उपलब्ध झाली आहे .
शासनाच्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान राबवले जाणार आहे. लक्ष्यीत लाभार्थ्यांना या माध्यमातून विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी, लाभार्थ्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड श्री .आप्पासाहेब गुजर यांनी केले आहे .





