‘त्या’ हल्ल्यातील जखमी तांडेल रणजीत बबन डोरलेकर याचा मृत्यू.!

95
  1. देवगडः  येथे भर समुद्रात झालेल्या भांडणाचे पडसाद देवगड बंदरात उमटले असून बेधुंद खलाशाने आपल्या सहकारी तांडेल व दोन खलाशांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर नवका जाळण्याचा प्रयत्न केला असून नौका जळाल्याने सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास देवगड समुद्रात घडली. या मारहाणीच्या घटनेत बोटीवरील तांडेल रणजीत बबन डोरलेकर (राहणार गावडे आंबेरी जिल्हा रत्नागिरी) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गोवा बांबुळी येते रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दोन खलाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी सावंत यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्याचबरोबर देवगड बंदरातील
फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. देवगड बंदरातील पंकज प्रभाकर पेडणेकर (राहणार खाक्षी) यांची मुक्ताई ही यांत्रिकी बोट गुरुवारी मच्छीमारीसाठी देवगड समुद्रात गेली होती. सोमवारी पहाटे दोन वाजता बोटी वरील खलाशी आनंद तुकाराम तांबे ( राहणार राजापूर) यांनी तांडेल व इतर खलाशी यांच्याबरोबर भांडण करण्यास सुरुवात केली. भांडणाचे स्वरूप वाढण्याच्या स्थितीत असल्यामुळे बोटीवरील सहाय्यक तांडेल रणजीत डोरलेकर यांनी याबाबतची कल्पना फोनवरून तात्काळ मालक पेडणेकर यांना दिली. यावेळी पेडणेकर यांनी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून तात्काळ बंदरात या असे सांगितल्यावर तांडेल डोरलेकर यांनी नौका थेट देवगड बंदरात आणल्यावर पहाटे 4:30 च्या सुमारास बोट नांगरावर उभी असताना खलाशी आनंद तांबे यांनी पुन्हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत भांडण्यास सुरुवात केली.