वेंगुर्ला : स्वयंभू श्री देवी माऊलीच्या आशीर्वादाने वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या, मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २०२३ अर्थात आज रोजी सायंकाळी ६.३० वाजल्यानंतर श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर, रेडी, (तालुका – वेंगुर्ला) येथे १००१ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचे उद्दिष्ट ठेवून “दीपोत्सव २०२३” कार्यक्रमाच्या नियोजन करण्यात आहे आहे.
दीपोत्सव या कार्यक्रमात भारतमातेच्या शहिद झालेल्या वीर जवानांकरिता आदरांजली म्हणून “एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी ” दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे.

दीपोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त आर्मी अधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांचा विशेष अतिथींच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात येतो,परंतु यंदा संस्थेचे प्रमुख संघटक कै.श्री राजन बापू रेडकर, रेडी यांचे दुःखद निधन झाल्याने सदर सैनिकांचा सन्मानाचा कार्यक्रम हा केला जाणार नाही. ह्या कार्यक्रमात स्वयंभू श्री सप्तेश्वर महादेवाच्या मंदिराला दिव्यांनी सजवून त्यात कै.श्री. राजन बापू रेडकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली उपस्थित बांधवांकडून देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा पंचतत्व ग्लोबल मीडिया, सतर्क पोलीस टाईम्स, भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, कोकण विभाग, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी अशी आयोजकांनी विनंती केली आहे.





