डॉ. अनिल सरमळकर ‘आप’ च्या वाटेवर ..?

मुंबई : तळकोकणातील ‘आंबेडकर इन आर्ट्स’ असे बिरूद ज्यांना युरोपीय विद्यापीठांतील बुद्धीमंतांनी दिले आहे असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार, कवी लेखक दिग्दर्शक आणि सामाजिक परिवर्तन चळवळीतील प्रसिद्ध कार्यकर्ते, वक्ते डॉ. अनिल सरमळकर सामाजिक व्यवस्था बदलाच्या प्रकीयेत देशात प्रॅक्टिकल कार्य करणाऱ्या ‘आम आदमी’ पार्टीमधे प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

गेली दोन दशके सर्जनशील आणि वैचारीक लेखन आणि रंगभूमीसाठी कार्यरत असताना सामाजिक परिवतर्नाच्या चळवळी सातत्याने आपले योगदान देणारे आणि आपल्या नाट्य लेखनाने जागतिक साहित्य आणि रंगभूमीवर आपले स्थान निर्माण करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार लेखक अनिल सरमळकर आता सामाजिक परिवर्तनाच्या उद्देशाने दिर्घ विचाराअंती राजकीय पक्षात प्रवेश करणार असुन त्यांनी आपल्या या नविन निर्णयानुसार ‘आम आदमी’ पक्षाची निवड केली असल्याचे समजते.

आजचा काळ हा लोकशाहीसाठी अत्यंत आव्हानात्मक असुन सामान्य जनतेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक भयंकर असे अराजक देशाला ग्रासत असताना समाज जिवनात राजकीय सत्तेच्या आधारे सामाजिक परिवर्तन आणणारा पक्ष म्हणुन मला आम आदमी पक्ष योग्य वाटतो. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि आदर्श नेते अरविंदभाई केजरीवाल यांच्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे.

त्यांच्यासारखेच लोकनेते आज देशासाठी दिलासा आहेत आणि आशा आहेत असे अनिल सरमळकर यांनी सांगितले आहे.
मात्र अद्याप प्रवेश निश्चित झाला नाही. मात्र त्या दिशेने माझा विचार कधीच सुरु झाला असुन संबंधीत प्रकीयेअंतर्गत नेतृत्त्वाशी माझी महत्वाची वैचारीक चर्चा दिर्घकाळ सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

इंग्लंड येथील विद्यापीठातील जॉन ब्रेट या कल्चरल थियरीस्ट ज्येष्ठ विचारवंताने अनिल सरमळकर यांचे लेखन आणि त्याची कलात्मक व्याप्ती पाहुन अनिल सरमळकर यांची ‘आंबेडकर इन आर्ट्स’ अशी संभावना करुन त्यांचा गौरव केला आहे.
मात्र दलित चळवळ साहित्य कला क्षेत्रातील गट तट आणि राजकीय दुकानदारी करणारे आंबेडकर विचारांचा व्यवसाय करणारे भुरटे लोक यांना कंटाळून अनिल सरमळकर कधीही कोणत्याही राजकीय पक्षात संघटनेत सहभागी झाले नाहीत.
दलित समाजकारण राजकारण सांस्कृतिकतेत आलेली कुंठितवस्था आणि स्थितीशिलता आणि नेते आणि कार्यकर्त्यांचा पराकोटीचा स्वार्थ आणि संकुचित विचार यामुळेच दलित चळवळ उध्वस्त अवस्थेत आली आहे.

मात्र सजग आणि व्यापक विचार परिपेक्ष विचार मांडणाऱ्या अनिल सरमळकर या तरूण लेखकाची उपेक्षा दलित साहित्य आणि कला क्षेत्रातील प्रवाहातील संकुचित विकृत लोकांनी केली. मात्र अनिल सरमळकर यांचे लेखन जागतिक स्तरावर पोहचल्यावर ते प्रकाशात आले आहेत.

मला अभिप्रेत असणारे व्यापक विचार मांडण्यासाठी माझ्याकडे लेखणी आहे मात्र सामान्य लोकांसाठी काही प्रत्यक्ष कार्यही माझ्या हातुन व्हावे यासाठी माझा पिंड राजकीय नसूनही मी जास्तीत जास्त आदर्श देश हितकारक तत्वे असणाऱ्या ‘ आम आदमी पक्षाची आणि नेता म्हणुन आदरणीय अरविंदभाई केजरीवाल यांनाचा प्राथमिकता देइन असे संपर्क साधला असता अनिल सरमळकर यांनी सांगितले आहे.

गेल्या दोन दशकांचा अथक सर्जनशील मानसिक संघर्ष अनिल सरमळकर यांना अगदी कमी वयातच ‘ आंबेडकर इन आर्ट्स ‘ बनवुन गेला आहे मात्र त्यामागे अहोरात्र घेतलेला ध्यास आणि एकूणच सर्व समाजांच्या मुक्तीच्या शक्यता पडताळून पाहणात्या साहित्य कलात्मकतेचा वैश्विक ध्यास आणि अभ्यास त्यामागे आहेच मात्र स्वतावर लादुन घेतलेला अभावाच्या जगण्याचा कुरतडणारा अभाव, उपेक्षा अपमान आणि बदनामीचा भयंकर काळ आणि तरीही सर्व समाजाबद्दल असणारी नैसर्गिक करुणा त्यांच्या लेखनात आहे.

मला कधीतरी हा निर्णय घ्यायचाच होता मात्र त्या आधी मी ‘The new republic india’ ही संकल्पना मांडली आहेच त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्याच्या नव्या शक्यता आणि त्याचे पुनचिंतन करु पाहणारा समिक्षेचा Rewriting of Ambedkar हा महाप्रकल्प सुरु आहेच. मात्र असहाय जनतेसाठी काही थोडेफार प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी एका अधिक व्यापक platform ची आवश्यकता भासेल. म्हणुनच या दिशेने मी विचार करणे योग्य समजतो असेही डॉ. अनिल सरमळकर म्हणाले.