सावंतवाडी : सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत साबाजी गावडे (आंबोली, गेळे वय ६६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले.
आठ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गोव्याच्या मणिपालमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी कणकवली, कुडाळ, तरळे, दोडामार्ग येथे ३४ वर्ष सेवा बजावली होती.
त्यांच्या मागे पत्नी , ४ मुली, जावई, नातवंडे, पुतणे, पुतण्या, भाचे, भाच्या आहेत. ओरोस सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिपरीचारिका सौ. श्रीप्रिया धुरी यांचे वडील तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसेविका सौ. प्राची राणे यांचे ते काका होत. त्यांच्यावर आंबोली गेळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.





