देवगड : देवगड समुद्रात सहा जण बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यातील पाच जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र याबद्दल चार मुलींचा मृत्यू झाला आहे तर एक जण वाचला होता. मात्र यातील एक जण बेपत्ता होता त्याचा मृतदेह आज रविवारी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास देवगड समुद्रात आढळून आला. त्यामुळे देवगड समुद्रात बुडाल्याच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता पाच झाली आहे.
पुणे पिंपरी – चिंचवड येथील खाजगी सैनिक अकॅडमीची 36 जणांची सहल देवगडला आली होती. मात्र या मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले समुद्रात बुडाल्याने त्यांच्या मृत्यू झाला व सर्व मुले 18 ते 22 वयोगटातील आहेत. देवगड समुद्रात एकाच वेळी आजचं बुडून मृत्युमुखी पडण्याची ही पहिलीच घटना आहे.
Home महाराष्ट्र देवगड Big Breakink – देवगड समुद्रात बेपत्ता असलेल्या रामचंद्र डिचोलकर याचा मृतदेह सापडला.!





