Big Breaking – देवगड समुद्रात बुडून चार मुलींचा मृत्यू.!

514

देवगड : पुणे जवळील पिंपरी चिंचवड येथील संकल्प सैनिक अकॅडेमीची सहल देवगड येथे आले असताना या ट्रिप मधून 35 विद्यार्थी आले होते.यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. यामधील सहा जण देवगड समुद्रात बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यात दोन मुलगे तर चार मुलींचा सहभाग आहे. यातील पाच जणांना काढण्यात यश आले असून चार मुलींचा मृत्यू झाला आहे तर एक जण अजूनही बेपत्ता आहे.
या सहलीमधील आकाश तुपे, राम डिचोलकर, प्रेरणा डोंगरे, अंकिता गार्ले, अनिशा सकपाळ, पायल बनसोडे,हे सहाजण बुडाले असून यातील पाच जणांना पोलीस व स्थानिक नागरिक विष्णू धुरत, मंदार धुरत, जितेश मोहिते, गुरुनाथ वाडेकर, राकेश खडपकर, अवी खडपकर मदतीने बाहेर काढली असून ग्रामीण रुग्णालयाचे उपचारासाठी दाखल केले आहेत. यातील राम डिचोलकर हा अजूनही बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध सुरू आहे तर आकाश तुपे वाचला आहे. घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी, तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले होते. यामधील चार मुलीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते.