Big News – देवगड समुद्रात सहा जण बुडाले.!

234

देवगड : पुणे जवळील पिंपरी चिंचवड येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आले असताना या ट्रिप मधून 35 विद्यार्थी आले होते.यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. यामधील सहा जण देवगड समुद्रात बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यातील पाच जणांना काढण्यात यश आले असून एक जण अजूनही बेपत्ता आहे.
या सहलीमधील आकाश तुपे, राम डीचोलकर, प्रेरणा डोंगरे,अंकिता गार्ले, अनिशा सकपाळ, पायल बनसोडे,हे सहाजण बुडाले असून यातील पाच जणांना पोलीस व स्थानिक नागरिक विष्णू धुरत, मंदार धुरत, जितेश मोहिते, गुरुनाथ वाडेकर , राकेश खडपकर, अवी खडपकर मदतीने बाहेर काढली असून ग्रामीण रुग्णालयाचे उपचारासाठी दाखल केले आहेत. यातील राम डीचोलकर हा अजूनही बेपत्ता असल्याने त्याची शोधाशोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले होते. यामधील चार मुलीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते.