नौदल दिनाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.! ; आ. नितेश राणेंच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात स्क्रीनद्वारे LIVE प्रक्षेपण.

43

देवगड : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदारसंघात स्क्रीनद्वारे नौदल दिनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. देवगड येथे वॅक्स म्युझियम, शिरगाव, पडेल कँटीन, तळेबाजार या ठिकाणी या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.


देवगड शहर येथे वॅक्स म्युझियम या ठिकाणी लावलेल्या स्क्रीनवर देवगडमधील बहुसंख्य नागरिकांनी थेट प्रक्षेपण पाहण्याचा आनंद लुटला . यावेळी उपस्थितांना भाजप पदाधिकारी यांचेकडून लाडू वाटण्यात आले. या नौदल दिनाच्या थेट प्रक्षेपणामुळे शहरातील गजबजाट काही काळ शांत झालेला पहायला मिळाला. यावेळी माजी आमदार अँड. अजित गोगटे, नगरसेवक शरद ठूकरुल, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, सौ. प्रणाली माने, शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवा मार्चा अध्यक्ष दयानंद पाटील आदि मंडळी उपस्थित होते.