बांदा : जागतिक किर्तीचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि महाविद्यालयाचे व शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. डॉ. बी. बी. गायतोंडे तज्ञयांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्ञानदीप व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प विख्यात मुक्त शोध पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार श्री. निळू दामले गुंफणार आहेत. ‘लोकशाहीचे काय होणार?’ या विषयावर त्यांचे व्याख्यान मंगळवार तारीख 5 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होईल. सर्व अभ्यासू, विद्यार्थी, जाणकार वाचक, अभ्यासक यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.





