सावंतवाडी : साटेली येथे मायनिंग वाहतूक रोखल्यामुळे वादंग निर्माण होऊन साटेली येथील दोन लोकप्रतिनिधी आणि एका पदाधिकाऱ्याला मायनिंग समर्थकांकडून जीवघेणी मारहाण करण्यात आल्याची घटना साटेली येथे घडली.मारहाण झालेल्या जखमीना प्राथमिक उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता जखमींवर प्राथमिक उपचार करून दोन जखमी व्यक्तींना घरी पाठवण्यात आले असून एकाला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातपाठवण्यात आले आहे.आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी मारहाणीची नोंद केली असून सदरचे प्रकरण हे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. एवढी मारहाण होऊन अद्यापपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.या मारहाणीवरून साटेली पंचकोशी परिसरात मायनिंग समर्थकांची दादागिरी वाढल्याचे स्पष्ट होत असून स्थानिकानी वेळीच सावध होऊन या दादागिरीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.





