अवतरला साक्षात विठूराया | आंबेगावच्या श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात हरिनाम सप्ताह

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कुशीत गर्द वनराईने नटलेलं गाव म्हणजे आंबेगाव. याचं गावातील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात आजपासून हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. यानिमित्त माघी एकादशी निमित्त श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाला पंढरीच्या विट्ठलाचे मनमोहक रूप देण्यात आले.  हि सजावट महेश राऊळ यांनी केली आहे.

यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामुळे अखंड हरिनाम सप्ताह प्रतीपंढरपूर असे स्वरूप प्राप्त झाले आहे.