दोडामार्ग : शालेय जीवनात शिक्षण जसे महत्वाचे आहे तसे क्रिडा हा विषय महत्वाचा आहे. शिक्षणाबरोबर क्रिडा क्षेत्रालाही महत्व द्या. विद्यार्थ्यांना क्रिड़ाक्षेत्र जीवनात यशस्वी बनवेल असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय क्रिड़ा प्रशिक्षक तथा फिटनेस मार्गदर्शक डॉ. अजित कुलकर्णी यानी नुतन विद्यालय कळणे येथे मुलांना फिटनेस मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी कळणे पंचक्रोशी शि.प्र.मं.कळणेचे संस्थापक प्रा.मा. मोहनराव देसाई, संचालक मा .नीरज देसाई, कबडी राष्ट्रीय खेळाडू सागर करांजकर, एक्सस्पोर्टस् फाऊंडेशन सहसंचालक अभिषेक कुलकर्णी, संक्रम म्युझिक अकादमी संचालक गणेशप्रसाद पोकळे, संक्रमचे संचालक दत्तप्रसाद साटेलकर, मुख्याध्यापक महेंद्र देसाई, शिक्षक प्रशांत राऊळ, उमेश देसाई, संजय तायवाडे, विट्ठल दळवी, निकीता सावंत, प्रसाद गोसावी, राजश्री देसाई, भरत दळवी, महादेव गावकर, संदीप दळवी, आदी उपस्थित होते.
कळणे पंचक्रोशी शि.प.मंडळ संचलित नुतन विद्यालय कळणे विद्यालयात नवनवीन शेक्षणिक उपक्रम राबविले जातात. नुकताच आयडियल स्कूल ऑफ म्युझिक या संगीत विद्यालयाची स्थापना करण्यात आली. आता तर क्रिडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.अजित कुलकर्णी यानी मार्गदर्शन करत बॉडी फिटनेशसाठी प्रात्यक्षिके स्वतः करत मुलाकडून करुन घेतली.
असे विविध कार्यक्रम संस्थेचे संस्थापक प्रा.मा.मोहनराव देसाई यांच्या प्रगल्भ कलल्पतेतून होत आहे. कळणे पंचक्रोशी शि. प.मं.कळणे संचलित नूतन विद्यालय कळणे व एक्स स्पोर्ट फाऊंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.अजित कुलकर्णी मुलाना मार्गदर्शन करताना म्हणालेत, ग्रामीण भागात चागले खेळाडू आहेत. गुणवंत खेळाडू आहेत. मात्र त्याना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ती गरज ‘एक्स स्पोर्टस् फाऊंडेशन’ पूर्ण करणार आहे.
कळणे विद्यालयातून आम्ही जिल्ह्यातील मुलाना प्रोत्साहन मार्गदर्शन देण्यासाठी हा कार्यक्रम सुरु केला आहे. फिटनेश बाबत मुली-मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी मुलाना फाऊंडेशन मार्फत मेडल देऊन गौरविण्यात आले.





