हडपिड स्वामी समर्थ मठात तब्बल १,१११ दिवे पेटवून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा.!

26

देवगड : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित, श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड येथे रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे निमित्त साधून सायंकाळी ७.०० वाजता ११११ अकरा दिवे भेटून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे साजरा करण्यात आला.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वामी मठाच्या गाभाऱ्यात तसेच मठाचा संपूर्ण परिसरात मंदिराभोवती दीप पेटविल्याने मंदिर परिसर दिव्यांनी उजळून गेला होता. मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व अध्यक्ष प्रभाकर राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या उत्सवाचे सुरुवात करण्यात आली तर स्वामींची आरती करून या उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.