देवगड : विजयदुर्ग तरळा मार्गावरील पडेल पोखरबाव जवळ रविवार २६ नोव्हेंबर २०२३ रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चक्क बिबट्याचे विजयदुर्ग येथे जात असलेल्या कार चालकाला लाईव्ह दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार २६ रोजी २०२३ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सव असल्याने बरेचसे नागरिक जामसंडे येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या यात्रेसाठी येत होते. त्यावेळी अचानक येणाऱ्या वाहन चालकांना लाईव्ह बिबट्याचे दर्शन झाल्याने वाहन चालक तसेच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पडेल पुरळ परिसरात याचं वर्षात बिबट्याने मोटरसायकलवर व पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याच्या घटना घडून गेल्या होत्या. आजही पडेल परिसरात बिबट्याचा मोकाट संचार सुरूच आहे. वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त वाहन चालक व जनतेमधून होत आहे.





