मुंबई : मुंबई, चेन्नईसह आयपीएलच्या 10 संघांनी रविवारी रिलिज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. रोहित शर्माच्या मुंबईने अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये महागड्या जोफ्रा आर्चरचा समावेश आहे. कोलकात्यानेही शार्दूलसह अनेक दिग्गजांना रिलिज केलेय. आरसीबीच्या संघाचीही तीच स्थिती आहे. हेजलवूड, हसरंगासह अनेकांना त्यांनी रिलिज केलेय. चेन्नईने बेन स्टोक्सला रिलिज केलेय.
दहा संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना वगळलेय.? –
चेन्नईने बेन स्टोक्स, डेवेन प्रिटोरियस, भगत वर्मा, एस. सेनापती, अंबाती रायडू (निवृत्त), आकाश सिंग, कायल जेमिसन, सिसंदा मागला या खेळाडूंना रिलिज केले.
आरसीबीने दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता –
अविनाश सिंह, डेविड विली, फिन अॅलन, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, केदार जाधव, मायकल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, वानंदु हसरंगा, वॅन पार्नेल.
मुंबईच्या ताफ्यातून कोण कोण बाहेर ?
ख्रिस जॉर्डन, डी. यानसन, ह्रतिक शौकिन, झाय रिचर्सन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद आर्शद खान, राखव गोयल, रमनदीप सिंह, रायली मेरीडथ, संदीप वॉरियर, थ्रिस्टन स्टब्स.
गुजरातच्या संघातून कोण कोण बाहेर ?
अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, केएस भरत, ओडियन स्मिथ, प्रदीप सांगवन, शिवम मावी, उर्वील पटेल, यश दयाल.
दिल्लीने कुणा कुणाला सोडले –
अमन खान, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, मनिष पांडे, मुस्तफिजूर, रहमान, फिल साल्ट, प्रियम गर्ग, रायली रुसो, रीपल पटेल, रोमन पॉवेल, सर्फराज खान.
राजस्थानच्या संघातून कुणाला सोडले –
अब्दुल पीए, अकाश वशीष्ट, जेसन होल्डर, जो रुट, केसी करिअप्पा, केएल असीप, कुलदीप यादव, एम. अश्विन, ओबिड मकॉय.
लखनौ सुपर जायंट्सने कुणाला रिलेज केले ?
अर्पित गुलेरिया, डॅनियल सॅम्स, जयदेव उनादकट, करन शर्मा, करुण नायर, मोनन व्होरा, , सुर्यांश शेगडे, स्वप्निल सिह.
कोलकात्याने कुणालाची केली सुट्टी –
आर्या देसाई, डेविड वाईसे, जान्सन चार्स्ल्स, कुलवंत खरोजिया, लिटन दास , लॉकी फर्गुसन, मनदीप सिंह, एन. जगदीशन, शाकीब अल हसन, शार्दूल ठाकूर, टीम साऊदी, उमेश यादव.
पंजाब किंग्सच्या ताफ्यातून कुणाला वगळले –
बलजीत ढंडा, बानुका राजपक्षे, गुरनीर सिंह ब्रार, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी, राज अंगद बावा, शारुख खान.
हैदराबादने कुणाला दाखवला बाहेरचा रस्ता –
विवरांत शर्मा, अदील राशीद, अखील हुसेन, हॅरी ब्रूक, कार्तिक त्यागी, समर्थ व्यास.




