१३ षटकार १९ चौकार अन् तीन अर्धशतके.! ; भारताने कांगारूंना लई धुतले, २३६ धावांचे दिले लक्ष्य.

38

तिरुवनंतपुरम: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 235 धावा केल्या. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने 53, ऋतुराज गायकवाडने 58 आणि इशान किशनने 52 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत ३१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल, परंतु रात्री फलंदाजी करणे सोपे आहे कारण दव आल्यावर भारताला गोलंदाजीमध्ये अडचणी येऊ शकतात.