भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मेश्राम उद्या सावंतवाडीत, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय महाप्रबोधन शिबीर होणार संपन्न.! ; अर्चना घारे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

58

सावंतवाडी : भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय अधिवेशन तयारी अंतर्गत उद्या सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय महाप्रबोधन शिबीर संपन्न होणार आहे. रवींद्र मंगल कार्यालय, बीएसएनएल ऑफीस जवळ, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या ठिकाणी उद्या दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २.३० ते सायं. ७.०० या वेळेत हे शिबीर संपन्न होणार असून याचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे असून राष्ट्रीय अध्यक्ष, भारतमुक्ती मोर्चा, नवी दिल्ली वामन मेश्राम हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते शफिक खान, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, ज्येष्ठ समाजसेवक काका मांजरेकर आदि प्रमुख पाहुणे असणार आहेत.

यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अॅड. माया जमदाडे (राष्ट्रीय कायाध्यक्षा, भारत मुक्ती मोर्चा महिला संघ), अॅड. संदीप निंबाळकर (ज्येष्ठ विधिज्ञ), डॉ. संजीव लिंगवत (संचालक, कोकण इतिहास परिषद, सिंधुदुर्ग), प्रा. व्ही. पी. नंदगिरीकर (आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक), प्रा. सचिन पाटकर (सदस्य, कोकण जिओग्राफर असोसिएशन ऑफ इंडिया) हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच विशेष उपस्थिती संदीप कदम (राज्य उपाध्यक्ष, कास्ट्राईब संघटना), अॅड. एस. व्ही. कांबळे (ज्येष्ठ विधिज्ञ), जनार्दन ताम्हाणेकर (अध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी गोवा राज्य), दीपक जाधव (अध्यक्ष, समाज जागृती मंच, दोडामार्ग), वाय. जी. कदम (वेंगुर्ला तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), मोहन जाधव  (ज्येष्ठ पत्रकार), बाबी तांबोसकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, लाडू जाधव (जिल्हाध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, सिंधुदुर्ग), डॉ. प्रमोद जमदाडे (गोवा राज्य प्रभारी), अॅड. शितल टीळवे, के. एस. कदम (जिल्हा प्रभारी, बहुजन मुक्ती पार्टी, सिंधुदुर्ग), तसेच सन्माननिय उपस्थिती पूनम नाईक (सामाजिक कार्यकर्त्या), दिलीप इन्सुलकर (चर्मकार उन्नती मंडळ, सावंतवाडी), कृष्णा गावकर (समीक्षा प्रभारी, गोवा राज्य), प्रशांत पाटणकर (ब्लु स्टार क्लब, सावंतवाडी),विश्वनाथ पडेलकर (उपाध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, सिंधुदुर्ग), व्ही. बी. जाधव (जिल्हाध्यक्ष, RMBRS सिंधुदुर्ग), विजय विर्नोडकर (मीडिया प्रभारी, गोवा राज्य), प्रदीप कांबळे (सावंतवाडी शहराध्यक्ष, वंबआ), सुजाता बावकर (उपसरपंच, ग्रा.प. बाव),  अॅड. अशोक रोडे (बुद्धीस्ट इंटरनेशनल नेटवर्क), सदानंद पवार, मंगेश परवार (प्रचारक, बामसेफ-गोवा), सुरेश कुंभारे (भारत मुक्ती मोर्चा, गोवा राज्य), मोहन ठाणेकर (अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा – गोवा),  मिनाक्षी जाधव, सत्त्वशीला बोर्डे (मूलनिवासी महिला संघ, सिंधुदुर्ग), शितल जाधव, अविनाश तांबे,  ऋषिकेश तांबे (RMBRS कणकवली) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उपस्थितीचे आवाहन निमंत्रक सगुण जाधव (जिल्हा प्रभारी, भारत मुक्ती मोर्चा), दादु कदम, पी. वाय. कांबळे, प्रतिक जाधव, स्वराज्य शिंदे,  अथांग जाधव, किशोर खरात, संकेत कुडाळकर,अनिकेत जाधव, संजय जाधव, नवनीत जाधव, सचिन जाधव, संदेश कांबळे, प्रवीण जाधव, संतोष पाटणकर, नामदेव कदम, मनोज जाधव, तुषार कदम यांनी केले आहे.

शिबिराचे संयोजक भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, बुध्दीस्ट इंटरनेशनल नेटवर्क, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व सहयोगी संघटना आहेत. अधिक महितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा. 9975552387, 7066409995, 9403947170