कणकवली येथे विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा.!

51

कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ‘भारताचे संविधान आणि उज्वल भारत’ या विषयावर संविधान दिनानिमित्त व्याखान झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांनी व्याख्यानाचे पुष्प गुंफले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अच्युतराव वणवे यांनी केले.

प्रास्ताविक सादर करतांना भारतीय संविधाचा इतिहास आणि संविधानाचे महत्त्व सरांनी विषद करून मार्गदर्शन केले. तसेच26/11/ हा मुंबई हल्ल्याचा काळा दिवस. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी शहीद झालेत, त्यांच्या स्मृती वणवे सरांनी यावेळी आपल्या भाषणात जागृत केल्या.  मुख्याध्यापक पी. जे. कांबळे सरांनी आपल्या भाषणातून संविधान आणि भारतीय मूल्य व्यवस्था तसेच संविधानाचे गाभातत्वे विषद केले. या कार्यक्रमाला पालक सभेचे अध्यक्ष बाबुराव सावंत व पर्यवेक्षिका सौ. जाधव मॅडम उपस्थित होते. संविधानाची उद्देशिका सौ. शिरसाट मॅडम यांनी सादर केली. यावेळी बहुसंख्येने पालक, विद्यार्थी व प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.