जांभवडे बामणवाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धा संपन्न.! ; श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळाचे आयोजन.

38

कुडाळ : श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडीच्या वतीने दरवर्षी तुलशी विवाहा निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.याहीवर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.एकूण अकरा स्पर्धेकांनी सहभाग घेतला.श्री.देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडी ही नोंदणीकृत ट्रस्ट असून या ट्रस्टच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.या वर्षी रांगोळी स्पर्धेत वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्यात आल्या.

या स्पर्धेत सौ.सोनाली शैलेश तर्फे प्रथम क्रमांक,कु.प्रांजल राजेंद्र सावंत द्वितीय क्रमांक,कु.प्राची सुहास तर्फे तृतीय क्रमांक तर सौ.अनघा संतोष चव्हाण उत्तेजनार्थ असे यश संपादित केले.सर्व यशस्वी स्पर्धक आणि सहभागी स्पर्धक यांचे मंडळाचे अध्यक्ष श्री.संजय तर्फे, सचिव श्री.वामन तर्फे, उपाध्यक्ष श्री.अरुण सावंत, खजिनदार श्री.संजय साळगांवकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.विठ्ठल भोगले, सचिव श्री.मोहन कदम, सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी अभिनंदन केले.या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध चित्रकार व रांगोळीकार श्री.समीर चांदरकर,(कट्टा हायस्कूल) चित्रकार श्री.प्रसाद राणे(विद्यामंदिर हायस्कूल कणकवली) यांनी केले . परीक्षकांचे मंडळाचे सचिव तथा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी आभार मानले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.