देवगड : सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मंजूर असलेल्या कामांच्या विकास कामाच्या प्रस्तावासाठी मतदानाचा घेण्याचा विषय आला. त्यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत या महाविकास आघाडी गटातून निवडून आल्या होत्या. शिवाय त्या महाविकास आघाडीच्या गटातील असल्याने गटनेते संतोष तारी यांचा आदेश त्यांनी पाळला पाहिजे असे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी सांगितले.यावर नगरसेविका प्रणाली माने यांनी तुमचा पक्ष राहिला कुठे असे असे सांगितल्या ने यावेळी स्वच्छता सभापती व नगरसेविका प्रणाली माने यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.यावेळी नगरसेवक संतोष तारी यांनी सभेमध्ये पक्ष काढू नका तुम्ही चार-पाच पक्ष बदललात अशी किती पक्षीय भजन मंडळे बंद झाली असा उपरोधिक टोला लगावल्याने उपस्थित सभागृहात एकच हसा पिकला. सिंधुदुर्ग समृद्ध योजनेअंतर्गत कामांच्या विषयावरून देवगड जामसंडे नगरपंचायती सर्वसाधारण सभा गाजली .या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सिंधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या विषयावरून मतदान घेण्यात आले. यावेळी सभेत ठराव घेण्याच्या बाजूने सात सदस्यांनी मतदान केले तर ठराव घेण्यास उपनगराध्यक्षा यांच्या सहित भाजपच्या सात असे एकूण आठ सदस्यांनी विरोध करून पुढील सभेत विषय घ्यावा अशी मागणी केली. देवगड जामसंडे शहरातील वॉटर एटीएम चे पूर्ण बिल अदा करूनही चार वर्षे एटीएम बंद अवस्थेत आहे. याकडे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी लक्ष वेधले तर 2020 मध्ये दोन्ही अदा करूनही बंद असल्याने यामध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप नगरसेवक बुवा तारी यांनी केला .
देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सौ मिताली सावंत,सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे,पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, आरोग्य सभापती विशाल मांजरेकर,उपस्थित होते.या सभेत जामसंडे येथे होणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यावेळी यात्रोत्सव ठिकाणी अन्य सुविधा तयार ठेवा अशी सूचना नगरसेविका सौ प्रणाली माने यांनी केली.
सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पर्यटन विकासासाठी ३ कोटी २० लाख रुपये निधी मंजूर झाला. यामध्ये बीच क्लिनर मशीन , गार्डन व बस स्टॉप या विकास कामांचा समावेश होता. यासाठी आवश्यक असणारे प्रस्ताव सादर करणेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात यावा असा विषय विषय पत्रिकेवर ठेवण्यात आला. या विषयावर चर्चा देखील झाली यावेळी विरोधी गटनेते शरद
ठुकरूल, नगरसेविका सौ प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर यांनी विकास कामांबद्दल प्रस्ताव घेण्याचा विषय पुढील बैठकीत ठेवण्यात यावा अशी सूचना केली. तसेच बीच क्लिनर मशीन ही देवगडसाठी स्वतंत्र मशीन देण्यात यावी अशी मागणी केली. यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि नगरसेवक निवृती उर्फ बुवा तारी यांनी मंजूर असलेल्या विकास कामाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी या बैठकीत मंजुरी द्यावी. विकासकामे रेंगाळत ठेवू नका विकास कामांना विरोध केला तर विकास कसा होणार असा प्रश्न विरोधकांना केला. या निधी अंतर्गत होणारी कामे प्रभाग 11 मध्ये शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात होत असल्याने विरोधकांकडून विरोध होत असा आरोप पाणीपुरवठा सभापती संतोष तारी यांनी विरोधकांवर केला. तर चांगल्या कामात खोड घालण्याचे प्रकार भाजपा नगरसेवकाकडून होत आहेत असा आरोप बुवा तारी यांनी केला. या विषयावरून सत्ताधारी नगरसेवक व विरोधी नगरसेवक यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपा नगरसेवक हा विषय पुढील सभेतच घ्यावा या विषयावर ठाम राहिले. तर सत्ताधारी नगरसेवक यांनी आजच्या सभेत या विषयाचा ठराव घेण्यात यावा यावर ठाम राहिले. त्यामुळे अखेर मतदानाचा मार्ग सत्ताधारी नगरसेवकांनी सुचविला. आजच्या सभेत सिंधुदुर्ग समृद्धी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांच्या प्रस्ताव व ठराव घेण्याच्या बाजूने सत्ताधारी गटातील सात नगरसेवकांनी मतदान केले तर उपनगराध्यक्ष सौ मिताली सावंत यांच्या सह भाजपच्या सात अशा एकूण आठ नगरसेवकांनी सभेत ठराव घेण्यास विरोध करण्याच्या बाजूने मतदान केले यावेळी शिवसेना शिंदे गट व उद्धव ठाकरे शिवसेना गट विकास कामाचे ठराव घेण्याबाबत एकत्र आल्याचे सभेत दिसून आले.
देवगड व जामसंडे शहरात बांधण्यात आलेल्या वॉटर एटीएम अद्याप बंद अवस्थेत असल्याने याची माहिती मिळावी अशी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी आजच्या सभेत मागणी केली. वॉटर एटीएम कधी सुरू करणार त्यांचे बिल आता केलं का ? असा प्रश्न बांदेकर यांनी उपस्थित केला यावर माहिती द्यावी अशी मागणी सभागृहात केली. मात्र सभागृहात माहिती देण्यास विलंब लागल्याने त्याचे फाईल गाळ झाली का असा संतप्त सवाल नगरसेवक बुवा तारी यांनी केला. त्यानंतर संबंधित विभागामार्फत माहिती देताना वॉटर एटीएमचे काम करण्याऱ्या ठेकेदाराला 15 ऑक्टोबर 2020 मध्येच पूर्ण रक्कम अदा केले असल्याचे सांगितले. यावर नगरसेवक संतोष तारी यांनी त्यावेळी नगराध्यक्ष, व मुख्यकार्यकारी कोण होते असे प्रश्न उपस्थित केला.या विषयावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगली धारेवर धरले .संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका. अशी मागणी नगरसेविका प्रणाली माने यांनी केली .या कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप नगरसेवक बुवा तारी यांनी केला.
देवगड कॉलेजनाका समोरून तारकर यांच्या घराजवळून जाणाऱ्या गटारात सांडपाणी सोडण्यात आले आहे .याचा त्रास संबंधितांना होत असून देवगड मध्ये सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे .याबाबत मुख्य रस्त्यालगत गटार सोडण्यात आलेल्या सांडपाण्याबाबत कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र द्या. तसेच देवगड जामसंडेमध्ये रस्त्यालगत दुकानदारांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. जामसंडेमध्ये काही ठिकाणी दुकानासमोर रस्त्यालगत चिरे उभे करण्यात आले आहेत. संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी त्या विभागाकडे पत्र व्यवहार करावा अशी मागणी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केली. देवगड जामसंडे मधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यासाठी कोणतीही उपाययोजना केली आहे याची माहिती मिळावी अशी मागणी नगरसेविका सौ माने यांनी केली. यावेळी स्वच्छता सभापती विशाल मांजरेकर यांनी सद्यस्थितीत चार कचऱ्याच्या घंटागाड्या सुरू असून दोन गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळत नाहीत कचरा डम्पिंग साठी दाभोळे येथे वीस गुंठे जागा दहा वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. त्या जागेची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे अशी माहिती दिली.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त कामांना मंजुरी देण्यात आली देवगड जामसंडे मधील हायमॅक्स टॉवरबाबत नगरसेवक शरद ठुकरुल यांनी लक्ष वेधले असता शहरातील सुरू असलेल्या हायमॅक्स टॉवरची माहिती यावेळी सभागृहात देण्यात आली.





