पाळये पुलाचे बांधकाम पूर्ण न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा : संदेश वरक

दोडामार्ग : दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाळये गावात रस्त्यावर असलेल्या पुलाचा भाग वाहुन गेला होता. त्यामुळे काही महिने वाहतूक बंद होती. गावातील ग्रामस्थांची गैरसोय होत होती.त्या पुलाला जोड रस्ता मातीचा भराव घालून सोय केली. पूर निधीतून या पुलाचे बांधकाम केले जाईल असे सांगितले. पण आज दोन वर्षे झाली, तरी पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी १४ फेब्रुवारी रोजी पुलाच्या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.