दोडामार्ग : कर्नाटक सीमा भागातून गोव्याकडे येणारा पाणी प्रवाह कर्नाटक सरकार बंधारा घालून रोखत आहे. त्याचे दुष्परिणाम गोव्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी गावासहित पाच गावांना भोगावे लागणार आहेत. याची दखल भाजप घेणार असून वरिष्ठ जो निर्देश देतील त्यानुसार पुढची दिशा ठरवली जाईल. तसेच येथील निसर्ग पर्यटन, वन, वन्य प्राणी, पक्षी तसेच कृषी पर्यटनावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विर्डी वासियांना दिली.





