देवगड : देवगड समुद्रात वारंवार अनधिकृत पश्चिम बोटिन द्वारे मासेमारी केली जात आहे या मासेमारीमुळे येथील पारंपारिक मच्छीमाऱ्यांना मच्छी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व पारंपारिक मच्छिमार सिंधुदुर्ग मालवण येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयासमोर एक डिसेंबर पासून मुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देवगड तालुक्यातील पारंपारिक मच्छीमाऱ्यांनी देवगड मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे हे निवेदन आज बुधवार 22 नोव्हेंबर रोजी मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी कार्यालय देवगड तहसीलदार कार्यालय व देवगड पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की,
देवगड तालुक्यातील पारंपारिक मच्छीमारांनी वारंवार देवगड तालुक्याच्या किनाऱ्यालगत अनधिकृत
पर्ससीन मासेमारी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे निवेदनामार्फत आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या बोटी अनधिकृतरित्या मासेमारी करतात आणि देवगड आनंदवाडी बंदरात मासे उतरतात व त्याच ठिकाणी नांगरावर असतात. या बोटी कुठल्या आहेत व ते कुठून येतात याची माहिती कोणालाही नाही.
अशा प्रकारच्या अनधिकृत पर्ससीन मासेमारीमुळे आम्हा पारंपारिक मच्छीमाऱ्यांना मासा मिळेनासा झालाय आणि थोड्याफार प्रमाणात मिळाला तर त्या मासळीला भाव मिळत नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. वारंवार विनंती करूनही आमच्या मागणीला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत नाही. पुढील आठ दिवसात या अनधिकृत पर्ससीन बोटीवर आपल्याकडून कारवाई करण्यात यावी. तसेच या बोटीना देवगड बंदरातून हाकलून देण्यात यावे. अन्यथा दिनांक १ डिसेंबर २०२३ पासून आपल्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग मालवण कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आमच्या या मागणीवर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा , अन्यथा आम्ही आमच्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देवगड तालुक्यातील पारंपारिक मच्छीमार संघटनेने देवगड मत्स्य व्यवसाय विभागाला दिला आहे.
यावेळी पारंपारिक मच्छिमार बांधव ज्ञानेश्वर खवळे,शशिकांत लब्दे ,विश्वास भुजबळ निळकंठ गावकर ,वसंत लाळये, विलास तेजम , संतोष लाड, पांडुरंग डामरी, गणेश गावकर, अरुण धुरी, बाबुराव राजम, अक्षय धुरी, आदी आदींसह मच्छीमार बांधव उपस्थित होते.

या निवेदनादरम्यान झालेल्या चर्चेत मच्छिमार बांधव आक्रमक होत त्यांनी मत्स्य परवाना अधिकारी यांच्याकडे प्रश्नांचा भडीमार सुरू केला . शासनाने नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांची आठ तासाची ड्युटी असताना सुरक्षारक्षक या ठिकाणी का नसतात शासन त्यांना फुकटचा पगार देते का ? या ठिकाणी सुपरवायझरची एक वर्ष झालं तरी नियुक्ती नाही मागणी केली पण यावर कारवाई होत नाही. एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण ? देवगड तालुका शांत असल्याने आम्ही कायदा हातात घेत नाही उद्या कायदा हातात घेतला तर छोट्या मच्छीमारी बांधवावरच केस होतात आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आम्हाला आता कारवाई होईल पर्ससीन बोटींना जी मर्यादा ठरवून दिली आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन करत ते मच्छीमारी करत आहेत मात्र आता पुन्हा असे विचारले झाले तर पारंपारिक मच्छिमार गप्प बसणार नसल्याच्या इशाराही यावेळी पारंपरिक मच्छीमारांनी दिला. पूर्वी एकूण ४३ बोटिंचा परवाना होता त्यानंतर काही निकषात बसत नसल्याने नौकाच्या परवान्याची संख्या १४ वर आली.त्यात ४ परवाने हे तालुक्यातील आहेत आणि एकूण १५ पर्ससीन बोटी जिल्ह्यात असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी रविंद्र मालवणकर यांनी दिली.





