- सावंतवाडी :: तालुक्यातील सातार्डा येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या तिसाली फिरती सोहळ्याची सांगता भक्तिभावाने मोठ्या थाटात पार पडली.
सातार्डा येथे केरकरवाडी तसेच रायाचे पेड येथून या अवसरी तरंगकाठीसह पंचायतीने कौल दिला. तर श्री देवी माऊलीची सुवासिनींनी खणा नारळांनी ओट्या भरल्या.मोठ्या उत्साहात व फटाक्यांच्या आतिषबाजीत या तिसाली देवांच्या फेरीचे स्वागत करण्यात आले.
गुरुवार दि 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. रवळनाथ पंचायतन देवस्थानचा फिरती सोहळा असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरणात झाले. देवतांच्या पूर्वापार चालत आलेल्या वाटा मोकळ्या करण्यात आल्या. संपूर्ण परिरिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली. शेण सारवून रांगोळी घालून देवतांचा कौल प्रसाद घेण्यात आला.
सातार्डा देवूळवाडी येथून श्री रवळनाथ मंदिर येथून चार दिवसीय फिरती सोहळ्याला मानकरी, इर्तिक व भाविकांच्या उपस्थितीत ढोलताश्यांच्या गजरात प्रारंभ करण्यात आला होता. श्री देव रवळनाथ, देवी माऊली, भूतनाथ देवांचे तरंगखांब व अवसारी देवदेवातांकडून भाविकांच्या समस्या या फिरती सोहळ्यात फिरती करण्यात आली. यावेळी भाविकांच्या पडस्थाळे सोडविली जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. फिरती सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर रात्री भटवाडी येथील श्री. केळकर यांच्या निवासस्थानी देवस्वारी विश्रांती घेत. दुसऱ्या दिवशी देवस्वारी श्री. पेळपकर यांच्याकडे विश्रांतीसाठी थांबली. या दोन्ही ठिकाणी पाहुणेर झाला. त्यानतर देवस्वारी रायाचेपेड येथील देव मांगरात निवास करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी तरचावाडा येथून आल्यानंतर देवस्वारी श्री महादेव मंदिरात विसावली आहे. या देवस्वारीत सातार्डा सरपंच संदीप प्रभू, अमोल प्रभू, मानकरी राऊळ, सातार्डेकर, घाडी, जाधव आदींची उपस्थिती होती. तर यात तरंगकाठी सोबत भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसले. रविवार 26 नोव्हेंबर जत्रोत्सवापर्यत ही देवस्वारी येथे राहणार आहे.





