मोती तलावात उडी घेतलेल्या ‘त्या’ मृत युवतीची ओळख पटली.! ;

597

सावंतवाडी : काल रात्री आठच्या दरम्यान राजवाड्याच्या समोर तलावामध्ये एक मुलगी तोल जाऊन पडली होती तिचं प्रेत आज सकाळी सव्वा आठच्या दरम्यान तलावात तरंगू लागले हे पाहून नागरिकाने गर्दी केली त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव शेखर सुभेदार, सुमेध गावडे तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत कदम व नितीन कदम यांनी बोटीच्या सहाय्याने तिला मोती तलावातून बाहेर काढले. त्याप्रसंगी सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक सरदार पाटील, पोलीस संतोष गलोले ,पोलीस विजय केरकर, होमगार्ड गणेश वेंगुर्लेकर व लेडीज पोलीस धनुजा ठाकूर यांनी पंचनामा केला त्यानंतर बॉडीला सरकारी हॉस्पिटलमध्ये पी एम साठी नेण्यात आले त्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्या मुलीची ओळख पटली आहे तिचं नाव तनवी कांबळे आहे वय वर्ष 17 मूळची तालुका चंदगड येथील असून सावंतवाडी न्यू खासगीलवाडा राहत आहे सदर मुलीची आई घटनास्थळी पोचून सर्व माहिती दिली त्याचप्रमाणे तिला अजून 3 बहिणी आहेत अशी ही माहिती समजली सध्या ती आरपीडी कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी वर्गामध्ये शिकत आहे.