‘या’ घटनेमुळे प्रवासीवर्गातून तीव्र संताप.! ; प्रवाशाकडून त्याबाबतची तक्रार नोंद.

131

देवगड : एसटी कर्मचार्‍यांचे नातेवाईक आहेत म्हणून सीटवर बसलेल्या वृध्द महिला प्रवाशांना उठवून, ‘आरक्षण आहे’, असे खोटे सांगून त्यांना जागा देण्याचा प्रकार देवगड अक्कलकोट गाडीत घडला. प्रवाशांना प्राधान्य न देता कर्मचारी व त्यांचा गोतावळ्याला प्राधान्य देणार्‍या ‘या’ एसटी प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार १७ नोव्हेंबर रोजी देवगड आगारातून सकाळी ७ वाजता सुटणाऱ्या या देवगड – अक्कलकोट गाडीमध्ये तळेरे येथे घडला.

नांदगांव येथे या गाडीत काही वृध्द महिला व प्रवाशी चढले.त्यांना कोल्हापूर पर्यंत प्रवास करायचा होता.गाडीचे वाहक उमराणी यांनी त्यांना तिकीटेही दिली.गाडी तळेरे येथे येताच काही गाडीत चढल्यानंतर काही सीटचे आरक्षण आहे असे सांगून वृध्द महिलांना व  प्रवाशांना त्या बसलेल्या सीटवरून उठविले व चढलेल्या प्रवाशांना जागा दिली.मात्र प्रवाशांनी या कृतीला आक्षेप घेतल्यावर कोणतेही आरक्षण ते प्रवाशी व वाहक दाखवू शकला नाही. गाडीतुन प्रवास करणारे देवगडमधील व्यापारी संजय सोमण यांनी देवगड आगाराचे आगार व्यवस्थापक निलेश लाड यांच्याशी संपर्क केला. लाड यांनी त्याच फोनवरून वाहकाला ज्यांना जागेवरून उठविले आहे. त्यांना तातडीने पुन्हा जागा द्या.फोनवरून आरक्षण होत नाही, असे सांगितले.  मात्र वाहकांनी वरिष्ठांचे आदेश असूनही दुर्लक्ष केले व वृध्द महिला व प्रवाशांना कोल्हापूरपर्यंत उभे राहून प्रवास करावा लागला. वाहकांनी फोंडके नावाच्या एसटी कर्मचार्‍यांचे हे नातेवाईक असून त्यांनी मोबाईलवरून आपल्याला जागा रिझर्व्ह ठेवण्यास सांगीतल्याने आपण जागा रिझर्व केल्या, असे निलेश लाड यांना सांगितले. मात्र वारंवार एसटी प्रशासन प्रवाशी सेवेला दुय्यम स्थान देत आहे.संजय सोमण यांनी देवगड आगारातील तक्रार बुकामध्ये शनिवारी याबाबतची तक्रार नोंद केली आहे.देवगड आगाराच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून ठिकठिकाणी गाड्या बंद पडणे, प्रवाशांना मानसिक त्रास देणे. अशा घटना वारंवार घडत असल्याने व वरिष्ठ बघ्याची भुमिका घेत असल्याने प्रवाशांना आपल्या सेवेसाठी एसटी आहे, असे वाटेनासे झाले आहे.

तक्रार बुकातील तक्रारींचीही दखल नाही –

देवगड आगाराच्या तक्रार बुकात अनेक तक्रारी नोंद असूनही तक्रारींची दखल व चौकशी केली जात नाही.या बुकामध्ये असेलेल्या तक्रारींची पोच तक्रारदारांना देण्याचे साधे सौजन्यही देवगड आगारातील कर्मचारी दाखवित नाहीत. यामुळे कर्मचारी प्रवाशांना जुमानतच नसल्याचे दिसून येत आहे.