चिंताजनक – सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीमध्ये रक्तपुरवठा विभाग राम भरोसे.? ; अमित वेंगुर्लेकर यांची सत्यमिमांसा.

58

सावंतवाडी : नुकत्याच उपजिल्हा रुग्णालयात पीडित रुग्णांच्या बाबतीत जबाबदार व्यक्तींनी तातडीच्या उपचारासाठी संबंधित जरी तगादा लावला तर शासकीय कामात अडथळा होत असल्याचे कारण दाखवून संबंधित सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींवर  गुन्हे दाखल केले जातात,मग एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यावर जर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागामध्ये कित्येक दिवस रक्ताची कमतरता असताना जर शासकीय कर्मचारी ‘राम भरोसे’ असतील तर मग आता पोलीस प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करणार?,  असा प्रश्न मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

आज दिनांक १७/११/२०२३ रोजी कुडाळ झाराप तिठा येथील एका महिला रुग्णास O+ रक्ताची तातडीची गरज होती. परंतु संबंधित रुग्णाचा नातेवाईक सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीमध्ये याबाबत विचारणा करण्यासाठी गेला असता त्याला तेथील कर्मचारी यांच्याकडून रक्त पुरवठा शिल्लक नसल्याचे सांगण्यात  आले.

  • जर एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असताना सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तपेढीमध्ये रक्तपुरवठा विभाग हा ‘राम भरोसे’ चालत असेल आणि यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाची रक्ताअभावी दगावण्याची शक्यता असेल तर या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये?,  याबाबत संबंधित  महाराष्ट्र राज्य सरकारने त्वरित दक्षता घ्यावी व सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय, उपशासकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागामधील त्रुटींवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तसेच रुग्णांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालय आरोग्य व्यवस्थित योग्यती नियोजित सुधारणा करावी. जेणेकरून गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची तुमच्या अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये.  याची सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय अधिकारी यांनी तातडीने अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
    अन्यथा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन भारत अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने आमरण उपोषणाचा मार्ग मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन भारत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीतर्फे अवलंबण्यात येईल, याची संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, असा इशारा मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आज सामाजिक माध्यमांतून  दिला आहे.