धक्कादायक वार्ता – अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय वाटवे यांची अकाली एक्झिट.!

290

सावंतवाडी :  येथील सुप्रसिद्ध अक्षर ग्राफिक्सचे मालक अभय प्रभाकर वाटवे (वय 45) यांचे अल्पशा आजाराने आज सायंकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगी, पत्नी,वडील असा परिवार आहे.अभय वाटवे हे मनमिळावू व शांत स्वभावाचे होते.अक्षर ग्राफिक्स या नावाने ते आपला प्रिंटिंग व्यवसाय गेले कित्येक वर्ष प्रामाणिकपणे सावंतवाडी येथे करत होते.त्यांच्या अचानक निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला समुपदेशन केंद्रातील समुपदेशक अर्पिता वाटवे यांचे ते पती होते.