- सिंधुदुर्गनगरी : १६ जिल्ह्यातील ५७ कृषी मंडल केंद्रापैकी ९ कृषी मंडळ केंद्रे सदोष आहेत यामुळे वैभववाडी सह काही तालुक्यात शेतकऱ्यांना कृषी विमा रक्कम जमा झाली नाही तर काहीना विमा कंपनीकडून मोबाईलला रक्कम जमा दाखविले जाते, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमच नाही. याबाबत कृषी अधीक्षकांच्या आणि रिलायन्स विमा कंपनीच्या संबंधितांशी झालेल्या चर्चेत २३ नोव्हेंबरपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरआंबा काजू विमानुकसान भरपाई रक्कम जमा करू, असे आश्वासन कंपनीचेप्रमुख अधिकाऱ्याने दिले आहे. २३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रिलायन्स कंपनीकडून रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू पीक नुकसान भरपाई बाबत यापूर्वी जिल्हा कृषी अधिक्षकांशी भेट घेऊन जिल्ह्यातील आंबा काजू पीक नुकसान भरपाई बाबत संबंधित रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा केल्या नाहीत याबाबत आमदार वैभव नाईक यांच्या समवेत भेट घेतली होती त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून याबाबत लक्ष वेधले होते संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी राज्याच्या १५६ कोटी आणि केंद्राचा १५ ६ कोटी हिस्सा जमाने केल्यामुळे सदरची विमा नुकसान भरपाई देणे शक्य नसल्याचे सांगितले होते वास्तविक शेतकऱ्यांनी मे अखेर आपला विमा रक्कम भरणाकडून त्यानंतर ४५ दिवस उलटले तरी संबंधित कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आले त्यामुळे आम्ही आंदोलन आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर आंबा काजू पिक विमा रक्कम न मिळाल्यास कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळ्या ठोकू असा इशारा दिला होता दरम्यानच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने आपल्याकडील ५०% प्रमाणे विमा रक्कम जमा केल्याने दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रकमा जमा केल्या जातील असे आश्वासन दिले होते त्यानुसार आम्ही जाहीर केलेले आंदोलन इशारा स्थगित केला होता परंतु रिलायन्स कंपनीकडून ५७ महसूल मंडळापैकी ३९ महसूल मंडळामध्ये विमा नुकसान भरपाई रक्कम वाटप होते. तर अठरा महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरची नुकसान भरपाई जमा झाली नाही. वैभववाडी सहकारी तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही याबाबत आलेल्या तक्रारीनुसार आज जिल्हा कृषी अधीक्षक रावत आणि विमा कंपनीचे प्रमुख अधिकारी प्रमोद पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत येत्या आठ दिवसात २३ नोव्हेंबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णपणे विमा रक्कम जमा करू असे सांगितले परंतु ५ ७ पैकी १८ महसूल मंडळामधील ज्या गावांना विमा रक्कम प्राप्त झाली नाही त्यांच्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार यावर झालेल्या चर्चेत नजीकच्या महसूल मंडळाच्या वेदर वेबसाईट नुसार डाटा घेऊन त्यानुसार सदरची रक्कम देण्यात येईल २३ नोव्हेंबर पूर्वी या रकमा खात्यावर जमा करू असे रिलायन्स कंपनीचे प्रमोद पाटील यांनी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनुसार सांगितले असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले
आंबा काजू पिक विमा रक्कम प्रश्न आंदोलन व संबंधित मंत्री अधिकाऱ्यांशी झालेला चर्चेनुसार या विमा रकमा जमा होऊ लागल्यानंतर काही सत्ताधारी पक्षातील नेते आमच्या मंत्र्यांमुळे सदरच्या रकमा जमा झाले असल्याचे वृत्तपत्रातून जाहीर करत श्रेय घेत आहेत. परंतु याचे श्रेय घेण्याबरोबर ज्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाल्या नाही सदोष असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपल्या मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा आणि त्याचे श्रेय घ्यावे तसेच १ जुलै नंतर ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळणार आहे अशा ३७ हजार शेतकऱ्यांची यादी वास्तविक जाहीर होणे आवश्यक होते म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आपल्या आंबा काजू बागेमध्ये खत घालणे आणि फवारणी करणेही कामे केली असती परंतु ३० नोव्हेंबर पर्यंत विमा रक्कम भरूनही जुलै संपला तरी विमा कंपनीकडून विमान नुकसान भरपाई दमान झाल्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आपल्याला यावर्षी विमा रक्कम मिळणार नाही म्हणून आंबा काजू बागेमध्ये फवारणी आणि खत घालणे बंद केले राज्यशासन आणि केंद्र शासनाने ३० नोव्हेंबर पूर्वी इमारत कम जमा करावी असे शेतकऱ्यांना यापूर्वी आव्हान केले आहे परंतु वास्तविक शेतकऱ्यांच्या विमा रखमा नंबर संपत आला तरी अजून मिळाल्या नाहीत त्यामुळे ३१ डिसेंबर पर्यंत या विमा रक्कमा भरण्याबाबतशासनाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी कृषी अधीक्षक आणि राज्याचे कृषिमंत्री यांच्याकडे केली जाणार असून जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळाकडून गोळा होणारा डाटा आणि सदोष कृषी मंडळ केंद्रे यामुळे शेतकऱ्यांची होणारी नुकसान भरपाई रकमा मिळण्यास होणारा विलंब यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने जागृत राहून आपल्या प्रत्येक गावामध्ये कृषी मंडळ व्हावे असा ठराव घेऊन राज्याचे कृषिमंत्री पालकमंत्री यांच्याकडे मागणी करावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन टप्प्यांमध्ये हा प्रदेश येत असून हायवे सह्याद्री आणि समुद्र या तीन टप्प्यामधील प्रत्येक विभागांमध्ये जोडण्यात आलेले गाव केंद्राच्या ठिकाणी पाऊस नसेल व अन्य ठिकाणी पाऊस पडला असेल तर तो शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती स्तरावर कृषी मंडल केंद्र व्हावे अशी मागणी करावी, असे आवाहन करताना सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी १८ मे पासून या प्रश्न आंदोलनाचा इशारा दिला होता. कृषी मंत्री आणि रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार हे आंदोलन त्यांनी स्थगित करावे अशी त्यांना आम्ही विनंती केली आहे जर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २३ नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर आंबा काजू पिक विमा रकमा पूर्णपणे जमा न केल्यास २ ४ नोव्हेंबर नंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराच सतीश सावंत यांनी दिला आहे.
Home ब्रेकिंग न्यूज …अन्यथा २३ नोव्हेंबरनंतर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू.! – सतीश सावंत यांचा इशारा.





