कोकण कट्टा सेवाभावी संस्थेकडून अदिवासी भगिनीना भाऊबीजनिमित्त साडी वाटप..!

48

मुंबई : आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी भानुबेन प्रविणशहा माध्यमिक शाळेच्या सभागृहामध्ये आदिवासी भगिनींना पारंपारीक पद्धतीने ओवाळणी करून साडी-चोळी देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. कोकण कट्टा विलेपार्ले यांच्याकडून अनेक स्तुत्य सामाजिक उपक्रम रावबिले जातात त्यातील हा एक उपक्रम असल्याचे अजित पितळे यांनी सांगितले.

कोकण कट्टाच्या संस्थापक अध्यक्ष अजितदादा पितळे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, जगन्नाथ गावडे, सुजित कदम, विवेक वैद्य, सुनील वनकुंद्रे जयवंत जोशी, विनोद आचरेकर प्रथमेश पवार यांच्यासमवेत श्रीराम मित्र मंडळाचे मनीष बनसोडे, संतोष मांडवकर, प्रदीप सिंग उपस्तीत होते. या उपक्रमासाठी श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले या उपक्रमात विशेष सहकार्य श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले, मुंबईचा पेशवा, वीर हनुमान सोसायटी, यांच्यासह समस्त विलेपार्लेकरांनी कोकण कट्ट्याला सहकार्य केल्याबद्दल कोकण कट्ट्याचे सचिव सुनील वनकुंद्रे यांनी आभार व्यक्त केले

सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्राम सवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते, कर्नाळा अभयारण्य परिसरातील कोरलवाडी, बानुबाईवाडी, वडमालवाडी, खैरासवाडी, डोंगरीची वाडी, चिंचेचीवाडी या आदिवासी वाड्यांवरील तीनशे आदिवासी भगिनी कार्यक्रमाला उपस्तीत होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बालग्राम मित्र राजेश रसाळ, राजू पाटील, सचिन पाटील, स्मिता रसाळ, सरिता पाटील, विजया मांडवकर, निकिता पाटील यांनी मेहनत घेतली.