सावंतवाडी – नेमळे बॉक्सवेलकडे एकामागून एक अशा येणाऱ्या तीन वाहनांमध्ये ठोकर होऊन विचित्र अपघात झाला. नेमळेहून गोवा मोपा विमानतळाकडे पोलिसांची स्कॉर्पिओ गाडी मार्गक्रमण करत असताना त्याच्या मागाहून स्विफ्ट डिझायर व स्विफ्ट डिझायरच्या मागून रेनॉल्ट डस्टर ही गाडी मार्गक्रमण करत होती. नेमळे बॉक्सवेलकडे रेनॉल्ट डस्टर या गाडीने स्विफ्ट डिझायरला धडक दिल्यानंतर स्विफ्ट डिझायर पुढे असलेल्या पोलिसांच्या स्कॉर्पिओ गाडीवर जाऊन धडक दिली. यामुळे तिहेरी अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून तिन्ही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. सदर अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस स्टेशनला करण्यात आली सोमेश गजानन नांदगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





