देवगड येथे 18 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन.! ; विठ्ठल मित्र मंडळ विठ्ठलवाडी देवगड यांचा उपक्रम.

57
  1. देवगड : येथील विठ्ठल मित्र मंडळ, विठ्ठलवाडी यांच्यावतीने शनिवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिर स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, लोकल बोर्ड, खालची बाजारपेठ, देवगड येथे होणार असून इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन उपक्रमास सहकार्य करावे, अशी विनंती विठ्ठल मित्र मंडळ, विठ्ठलवाडी, देवगड यांच्यावतीने करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी अनिल कोरगावकर (९४२३८८४२८२), अमित पारकर (९१७५१६१९१७) त्यांच्याशी संपर्क साधावा असे मंडळाने कळविले आहे.