देवगड : देवगड तालुका मराठा मंडळामार्फत मराठा समाजातील वधू-वरांसाठी विवाह नोंदणी केंद्र नुकतेच स्थापन केल्याची माहिती तालुकाध्यक्ष श्री संदीप साटम आणि कार्यवाह केदार सावंत यांनी दिली.नुकत्याच झालेल्या तालुका समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. वधू-वरानी नोंदणी केल्यानंतर तालुक्यामध्ये भव्य असा वधू वर सूचक मेळावा लवकरच घेण्याचे याप्रसंगी ठरविण्यात आले. या वधू वर सूचक केंद्रासाठी प्रमुखपदी योगेश राणे (देवगड कॉलेज ) व संजीव राऊत (देवगड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच या संदर्भातील आवश्यक असणाऱ्या नियम अटीं व फॉर्म बाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन हे नोंदणी अर्ज प्रवीण वातकर, देवगड ( 94233 03505), सूर्यकांत पाळेकर,देवगड (9404443906),केदार सावंत,तळेबाजार (9307338977), नंदन घोगळे, तळेबाजार (94212 64691), ,योगेश राणे, हडपिड(94233 04050), मनोज सावंत, वळीवंडे ( 95529 80571), सुधीर तांबे, जामसंडे (86053 07744), अजित राणे, बापर्डे (94211 44055) यांच्याकडे उपलब्ध आहेत.
तरी जास्तीत जास्त इच्छुक वधू-वरानी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी केले आहे. मराठा मंडळातर्फे याशिवाय तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही सुरू केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी नंदन घोगळे, सूर्यकांत पाळेकर, बंटी कदम, किसन सूर्यवंशी, अविनाश सावंत, शशांक साटम, संजीव राऊत, योगेश राणे, प्रवीण वातकर, लल्ला पाटील तसेच मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.





