सावंतवाडी : आजपासून सुरू झालेल्या दिवाळीच्या सणासोबत सर्वांना सुख, समृद्धी, निरामय आयुष्य लाभो, तमाम कोकणवासीयांची उत्तरोत्तर प्रगती होओ, अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा यशस्वी युवा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या आहेत.
यंदाची दीपावली महाराष्ट्रातील तसेच कोकणातील युवकांना भरभराटीची जावो, त्यांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांनी यशस्वी जीवन संपादन करोत, अशी त्यांनी मनोकामनाही व्यक्त केली.





