दिवाळीच्या तोंडावर वरळी सी लिंकवर कारच्या भीषण अपघातात ३ जण ठार, ६ गंभीर जखमी.!

86

मुंबई : वरळी सी लिंक टोल नाक्यावर काल गुरुवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन भरधाव कारची धडक होऊन तीन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे येथील मार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री १० च्या मुंबईच्या सी लिंक टोल नाक्यावर हा भीषण अपघात झाला. टोल नाक्यावर उभे असलेल्या दोन वाहनांना मागून भरधाव वेगात आलेल्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमी नागरिकांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.

वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात एक इनोव्हा कार वांद्र्याला जात होती. यावेळी गाडीवर नियंत्रण सुटल्याने टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना ही कार धडकली. यावेळी पाठीमागून येणारी आणखी ६ वाहने एकमेकांवर आदळली. यामुळे १० जण जखमी झाले तर यातील तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. आरोपी चालकाला ताब्यात घेऊन इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे.