- वेंगुर्ला : तालुक्यातील वेतोरे येथे गुरुवार दि ९ नोव्हेंबर २०२३ रोजी हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या सहकार्याने केंद्रशाळा नं १, मिरमेवाडी प्राथमिक शाळा, डिगवेवाडी प्राथमिक शाळेत मोफत नेत्रतापासणी शिबीर घेण्यात आले. या तिन्ही शाळेतील १३२ विद्यार्थी व २० पालक असे एकूण १५२ जणांची मोफत नेत्रतापासणी करण्यात आली.त्यात दोन मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष संजय पिळणकर, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक बागलकर गुरुजी, एसएसपीएम हॉस्पिटलचे डॉ. जोशी, केंद्रप्रमुख नितीन कदम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याध्यापक गोसावी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे वेंगुर्ला अध्यक्ष समृद्धी पिळणकर, हातभार चॅरिटेबल ट्रस्टचे वेंगुर्ला संपर्क प्रमुख प्रतीक खानोलकर, सौ.उर्मिला पेडणेकर आदी उपस्थित होते.





