वेंगुर्ला : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ला येथे दि ८ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोज
वेंगुर्ला : गोवा बांबोळी येथील रक्तपेढीमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे,त्यामुळे गोवा मेडिकल कॉलेजच्या रक्तपेढीकडून सिंधुरक्तमित्र
प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग या संस्थेला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत संपर्क करण्यात आला,त्यानुसार अवघ्या ८ दिवसात उद्या बुधवार दि ८ नोव्हेंबर २०२३ रोजी आयटीआय वेंगुर्ला यांच्या सहकार्याने *आयटीआय वेंगुर्ला* (कॅम्प – म्हाडा कॉलनी) येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी रक्तदात्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात येत आहे.
इच्छुक रक्तदात्यांनी ज्ञानेश्वर मांजरेकर (९४२३३०१०२७), सौ.समृद्धी संजय पिळणकर (७५८८९७१२४९),प्रतीक खानोलकर ९४०४८०१२९३,संदीप धुरी (९८६०६८२१६९) यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.





